पटवर्धन कुरोली येथे गेले काही दिवसांपासून तलाठी पुर्णवेळ उपलब्ध नसल्याने या गावातील अतिवृष्टी चे नुकसान भरपाईचे कामकाज अतीशय धिम्या गतीने चालू आहे. मागील काही दिवसांपूर्वी पटवर्धन कुरोली येथेल तलाठी भाऊसाहेबांची बदली झाली. नवीन कर्मचारी कामावर रुजू झाले. परंतु लगेच रजेवर गेले. यानंतर दुसऱ्या कर्मच्याकडे पद भार देण्यात आला. याच दरम्यान अतिवृष्टी चे पंचनामे चालू झाले. पहील्या कर्मचारी रजेवर गेल्याने दुसऱ्या कर्मचारी याच्या मध्ये चार्ज घेण्यादेण्यावरुन तात्पुरता वाद झाल्याने गेल्या पंधरा ते वीस दिवसांत तलाठी कार्यालयात जबाबदार कर्मचारी उपलब्ध नाही. सर्कल मॉडम व मदतनीस यांनी अतिवृष्टी चे कामकाज पुर्ण करत आहेत. परंतु सह्या करणारा ज्याच्याकडे पदभार आहे, तो रजेवर गेलेला कर्मचारी हे दोन्ही कर्मचारी हजर तर नाहीतच पण फोनही उचलत नाहीत. त्यामुळे पटवर्धन कुरोली येथील अतिवृष्टी,शाळेचे दाखले, बॉंकेचे कामकाज, उत्पन्नाचे दाखले, कामकाज,पुर्णपणे बंद आहे पुढील दोनच दिवसात योग्य त्या कर्मचार्याची उपलब्धता झाली नाही तर पटवर्धन कुरोली येथील ग्रामस्था सह स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, तंटामुक्त समीती, सर्वांचे वतीने शासनाच्या गलथान कारभाराला जाग आणण्यासाठी बोंबाबोंब अंदोलन करण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन राहील.