आता ट्रेनमध्ये WhatsApp वरून जेवण ऑर्डर होणार.

 

 आता ट्रेनमध्ये WhatsApp वरून जेवण ऑर्डर होणार.


  


IRTC: तुमचा रेल्वे प्रवास सुखाचा आणि आनंदाचा कसा होईल. यासाठी भारतीय रेल्वे विभाग सातत्याने नवनवीन योजना आणत असते. या योजनेतून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणे हे त्याच्या मागे हेतू असतो. अशा योजनांमुळे आणि वेगवेगळ्या संकल्पनांमुळे भारतीय रेल्वे ही भारत देशातच नाही तर पूर्ण जगभरात चर्चेचा विषय बनते. अशीच एक चांगली संकल्पना रेल्वेने प्रवाशांसाठी आणला आहे.

आता रेल्वे तुम्हाला जेवण देणार.

रेल्वेमध्ये बरेच दिवसांपासून जेवण हे मिळते.आता पर्यंत रेल्वे कडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा ऑनलाइन चालू होती. इथून पुढे ही सुविधा WhatsApp वरही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जेवण ऑर्डर करणे सोपे होईल. इ कॅटरिंग सर्व्हिस आधिक ग्राहक आकर्षित होण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. 

जेवण ऑर्डर करण्यासाठी WhatsApp नंबर जारी केला आहे. हा नंबर 8750001323 असा आहे. हा नंबर मोबाइल मध्ये सवे करा आणि ऑर्डर करा.ही सेवासध्या निवडक ट्रेनसाठी उपलब्ध आहे. लवकरच सर्व ट्रेन मध्ये ही सेवा सुरु होणार आहे.

WhatsApp वरून असे जेवण करा ऑर्डर.

ट्रेनमध्ये आपल्या सिटवर खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठी सेव्ह केलेल्या नंबर वरून मॅसेज करायचा आहे.त्यानंतर आपला 10अंकी PNR नंबर टाकायचा आहे. त्यानंतर रेस्टॉरंट निवडल्यावर खाद्यपदार्थाचे ऑर्डर द्यायची आहे. आपल्या काय खायचे आहे याची निवड करून आपण ऑर्डर करू शकतो.