7/12 : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! जमिनीचा सातबारा आता आधार कार्डला लिंग होणार, भूमी अभिलेख विभागाचा नियम.
7/12 : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी भूमी अभिलेख विभागाकडून आली आहे. सातबारा हा आपल्या शेतीचा महत्त्वाचा पुरावा आहे. आता या सातबारा उताऱ्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. या शेतकऱ्याला माहित असणे आवश्यक आहे. भूमी अभिलेख विभागाने नवीन योजना सातबारा साठी आणली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना फायदा होईल. मग माहिती करुन घेऊया काय योजना आहे.
सातबार आधर कार्डशी लिंक करणे बाबत.
भूमी अभिलेख विभागाने सातबारा उताऱ्या करीता नविन योजना राबवत आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे. त्यांचे आधार कार्ड थेट शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर जोडले जाणार आहे.
आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीचा महत्त्वाचा कागद म्हणजे सातबारा आधार कार्डला लिंक करणे महत्त्वाचा आहे.
त्याचे मूळ कारण म्हणजे सातबाराचा कोणताही चुकीचा दुरुपयोग होऊ नये. त्याच बरोबर पॅन कार्ड, मतदान कार्ड,बँक खाते, गॅस कनेक्शन मोबाईल क्रमांक ईत्यादी. कागदपत्रांवर वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्याकरिता आधार लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सातबरा वर शेतकऱ्यांचा मालकी हक्क सहज समजू शकतो.
अशा पद्धतीने केले जाईल लिंक ?
• महा ई सेवा केंद्रात तुमचे बायोमेट्रिक पद्धतीने हातांच्या बोटाचे ठसे घेऊन सातबारा लिंक होणार आहे.