जुन्या काळात या सेंद्रिय साबणाचा वापर केला जात असत.
जुन्या काळात कपडे धुण्याचा साबण नसताना. सेंद्रिय साबनाचा वापर करत असत.
आज आपले कपडे धुण्यासाठी आपण वेगवेगळे साबण वापरतो. किंवा वेगवेगळ्या प्रकारचा निरमा वापरतो. म्हणून कपडे धुताना जास्त मेहनत करावी लागत नाही. आणि कपडे सुद्धा स्वच्छ होतात. त्यावरील मळकट डाग निघतात. साबण आणि निरमा नंतर आला. 120 वर्षांपूर्वी ब्रिटिश कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये पहिला साबण आणला. या कंपनीचे नाव लेबर ब्रदर्स इंग्लंड असे होते.भारतीय बाजारपेठे साबण येण्यापूर्वी जुने लोक कपडे कसे स्वच्छ करायचे ते माहीत करून घेऊया.
कपडे धुण्यासाठी जुने लोक याचा वापर करत होते.
आपल्या देशामध्ये साबण हा सन 1897साली कारखाना टाकण्यात आला. हा कारखाना मेरठमध्ये सुरु केला.या कारखान्यात फक्त आंघोळ आणि कपडे धुण्याचा साबण तयार होत असे. त्यापूर्वी भारतीय लोक रेठाचा वापर करत होते. या रेठाची झाडे शेतात आणि बगीचे मध्ये लावली होती. रेठाच्या झाडाच्या साली पासून फेस निघत असत.हा फेस मळकट कपड्याला लावल्यावर कपडे स्वच्छ होत होती.
वाळूचा वापर करून कपडे धुत असत.
साबणाचा शोध लगण्यापूर्वी जुन्या काळी कपडे धुण्यासाठी वाळूचा देखील वापर करत होते. कारण वाळू मध्ये वेगवेगळे खनिजे असतात. गरम पाण्या मध्ये कपडे आणि वाळू कपडे भिजयला टाकत होते.आणि मग कपडे घासून वाळवले जात होते.