एका एकरात शेतकरी होणार करोडपती.

 एका एकरात शेतकरी होणार करोडपती.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, की एका एकरामध्ये शेतकरी करोडपती कसा होणार.






Business idea : आज काल तरुण वर्गाचा कल शेतीकडे जास्त आहे. आज तुम्हाला एक पीक सांगणार आहे ते कमी खर्चामध्ये जास्त फायदेशीर ठरत आहे. त्या पिकाचे नाव पांढरे चंदन आहे.  तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं असेल. तर पांढऱ्या चंदनाची लागवड करू शकता.या शेतीतून तुम्हाला वर्षानुवर्ष उत्पन्न आणि नफा मिळू शकतो. तुम्ही या पिकाची लागवड केल्यावर काही वर्ष वाट पहावी लागेल. परंतु या चंदनाचे झाड मोठे झाल्यावर तुम्हाला उत्पन्न हे भरघोस मिळते.
 
पांढऱ्या चंदनाचा उपयोग आणि फायदा.
पांढरी चंदन हे खूप वेगवेगळ्या फायद्यांसाठी उपयोगी येत असते. त्यापासून अत्तर, फर्निचर, साबण, खेळणी, अगरबत्ती, देवाच्या मूर्तीला लेप लावण्याकरिता, खाद्यपदार्थ अशा,वेगवेगळ्या कामासाठी उपयोग होतो.या बरोबर याच शेतीमध्ये मिश्र शेती ही आपण करू शकतो. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे पिके घेऊ शकतो.

 केव्हा उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते.
चंदनाचे पूर्ण झाड 13 ते 14 वर्षात तयार होते. एका एकरामध्ये 400 ते 450 रोपे लावली जातात. रोपांमधले अंतर रुंदी 15फूट, लंबी 15फूट  असणे आवश्यक आहे.एका एकराला खर्च हा एक लाख ते दीड लाख रुपये येतो.

 पांढऱ्या चंदनची किंमत काय आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पांढऱ्या चंदनाची किंमत किलो मागे 25 ते 30 हजार रुपये आहे. चंदनाच्या झाडाला पंधरा वर्षे पूर्ण विकसित झाल्यावर. तीन कोटी पेक्षा जास्त कमाई होईल. परंतु चंदनाचे झाडे तोडण्यासाठी वन विभाग अधिकाऱ्यांची परवानगी काढावी लागते. मग ते झाड तोडून आपण विकू शकतो.