ही भाजी आहे सोन्यापेक्षाही महाग ?
या भाजीचे नाव हॉप शूटस् आहे. या भाजीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दर हा साधारण पणे युरोपीय चलनात एक हजार युरो असा आहे. या झाडाच्या भाजीचे देठ खण्यासाठी वापरले जाते. त्याचबरोबर या भाजीच्या झाडाची फुले आहरत वापरतात.त्यांना हॉप कॉर्न असे म्हणतात.
या झाडाच्या फुलांचा मुख्य वापर बिअर बनविण्यासाठी केला जातो. या झाडांमध्ये औषधी गुणधर्म देखील आहे. ही भाजी आहारात खाल्ल्याने सांधेदुखी, दात दुखी, टीबी आणि कॅन्सर असे रोग बरे होतात. या झाडाच्या डेटाचा वापर काही देशांमध्ये लोणचे बनवण्यासाठी सुद्धा करतात. इसवी सन पूर्व काळापासून या भाजीची कल्पना लोकांना होती. आणि ते ही भाजी सुद्धा आहारात वापरत होते. जर्मनीच्या काही भागात हॉप शूटस् पहिल्यांदा ही शेती केली गेली. भारत देशामध्ये या भाजीला मागणी नसल्यामुळे येथील लोक शेती करण्यास टाळतात.