9 वेळा लिहिलेला शब्द सुसाइट नोटमध्ये चुकला? :फलटण महिला डॉक्टर प्रकरण

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे फलटण येथील डॉक्टर महिला प्रकरणात आता एक वेगळे वळण आले आहे.…

प्रसूतीतील हलगर्जीपणामुळे १२ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई

प्रतिनिधी (सातारा):

सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयाने (Satara District Consumer Disputes Redressal Commission) सदरबझार येथील महिला डॉक्टर डॉ. स्मिता कासार यांना प्रसूतीदरम्यान झालेल्या कथित हलगर्जीपणामुळे आणि गर्भवती महिलेला झालेल्या मानसिक त्रासामुळे १२ लाख २५ हजार रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष न्या. प्रमोद गिरी गोस्वामी, सदस्य न्या. रोहिणी जाधव, आणि सदस्य न्या. मनिषा रेपे यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

काय आहे प्रकरण?

लिना मंगेश इंदलकर (रा. इंदवली पोस्ट करंदी, ता. जावली) यांनी डॉ. स्मिता कासार यांच्याविरुद्ध ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार लिना इंदलकर या २५ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रसूतीसाठी डॉ. स्मिता कासार यांच्या रुग्णालयात गेल्या होत्या. प्रसूतीवेळी डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला, ज्यामुळे बाळाचा एक हात दुखावला गेला.

यानंतर बाळावर साताऱ्यातील अन्य रुग्णालयांमध्ये आणि पुढे पुणे येथेही उपचार करण्यात आले. मात्र, बाळाचा हात कायमस्वरूपी ठीक होऊ शकला नाही. या गंभीर घटनेनंतर, लिना इंदलकर यांनी १ नोव्हेंबर २०१६ रोजी सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयात डॉक्‍टरांविरुद्ध नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. या दाव्यात त्यांनी १५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. सुमारे १० वर्षे हा खटला न्यायालयात सुरू होता.

न्यायालयाचा निर्णय

तक्रारदार यांच्यावतीने ऍडव्होकेट एम.बी. पाटील यांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून ग्राहक न्यायालयाने निर्णय दिला. सदोष वैद्यकीय सेवा पुरवल्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपये आणि गर्भवती महिलेला मानसिक त्रास झाल्याबद्दल सव्वादोन लाख रुपये (म्हणजे २ लाख २५ हजार रुपये) अशी एकूण १२ लाख २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई डॉ. स्मिता कासार यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हा निर्णय वैद्यकीय सेवेत झालेल्या कथित हलगर्जीपणाबाबत ग्राहक न्यायालयाने दिलेला एक कठोर धडा मानला जात आहे.

लहान मुलांना ‘हे’ 5 पदार्थ चुकूनही देऊ नका खायला, चवीच्या नादात आरोग्याचे होईल मोठे नुकसान

मुलांच्या चांगल्या विकासासाठी योग्य आहार खूप महत्वाचा आहे. मात्र पालक अनेकदा मुलांना असे पदार्थ देतात जे…

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जवळपास 14 हजार महिलांना कॅन्सर असल्याची खळबळ जनक माहिती समोर….

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जवळपास 14 हजार महिलांना कॅन्सर असल्याची खळबळ जनक माहिती समोर….   हिंगोली जिल्ह्यात…

‘असंख्य भारतीय मुस्लिमांना…’, Shikhar Dhawan ची कर्नल सोफिया कुरेशीवरील पोस्ट का होत आहे Viral?

Shikhar Dhawan on Sophia Qureshi : 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 जणांची हत्या केली होती.…

‘लेका, सरेंडर कर,’ दहशतवाद्याला समजावत होती आई; म्हणाला ‘सैन्य समोर आल्यावर…’; एन्काऊंटरमध्ये खात्मा झालेल्या आमीरचा VIDEO समोर

Jammu Kashmir Encounter: जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरामधील त्राल येथे गुरुवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा…

‘येणाऱ्या पिढीसाठी पर्यावरण सुरक्षित ठेवणे हे पतंजलीचे ध्येय आहे’, या बाबतीत ते किती यशस्वी झालेत? याविषयी जाणून घेऊयात

Patanjali : पतंजली हा भारतातील टॉप FMCG ब्रॅण्ड्सपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या कामकाजात पर्यावरणरक्षणाला आपले सर्वोच्च…

पतंजलीमध्ये सस्टेनेबिलिटीला फक्त कॉर्पोरेट जबाबदारी समजत नाही, कारण काय?

पतंजलीचे निसर्ग आणि पर्यावरणावरील प्रेम त्यांच्या विचारसरणीत इतके खोलवर रुजलेले आहेत आज ते त्यांच्या जीवनात अविभाज्य…

तुर्कीएला भारताचा आणखी एक दणका! पर्यटन, व्यापारानंतर आता आणखी एक बहिष्कार

तुर्कीएनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर आता भारतानं तुर्कीएला दणक्यावर दणका देण्यास सुरुवात केली आहे. पर्यटन, व्यापारानंतर आता…

55 बँकांनी एकत्र येऊन मुकेश अंबानींना दिले 242150000000 रुपयांचे जगातील सर्वात मोठे कर्ज? एवढ्या पैशांचे अंबानी काय करणार?

Mukesh Ambani  Reliance India’s Biggest Loan : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात मोठे उद्योगपती मुकेश…