खामगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदी सौ.शारदाताई शर्मा यांची निवड

खामगाव : दि. ४ जानेवारी २०२६ रोजी बुलढाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान खामगाव शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ. शारदाताई शर्मा यांची निवड जाहीर करण्यात आली.

या कार्यक्रमास बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव निर्मलाताई तायडे, पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सेवाभावी वृत्ती, सामाजिक बांधिलकी आणि संघटन कौशल्य असलेल्या सौ. शारदाताई शर्मा यांची महिला अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उपस्थित नेतेमंडळींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश सचिव निर्मलाताई तायडे यांच्या हस्ते सौ. शारदाताई शर्मा यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

महिलांचे संघटन अधिक मजबूत करून महिलांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिव–शाहू–फुले–आंबेडकर, महात्मा गांधी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेचा प्रचार घरोघरी पोहोचवण्यात येईल, असा विश्वास प्रदेश सचिव निर्मलाताई तायडे यांनी व्यक्त केला.

सौ. शारदाताई शर्मा यांच्या निवडीबद्दल खामगाव शहरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख, खामगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सरस्वतीताई खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, नवनिर्वाचित नगरसेविका व नगरपरिषद गटनेत्या फौजीया शेख आबीद, नवनिर्वाचित नगरसेवक तहेसीन शाह, नवनिर्वाचित नगरसेविका सौ. गायत्री तासतोडे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो”, “आम्ही सर्व-अजित पर्व”, “अजितदादा पवार साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *