रामभाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश-चिंचोली भोसे च्या शिरसागर वस्ती येथील भगीरथ डीपीचा दीर्घकालीन प्रश्न मार्गी

प्रतिनिधी – पंढरपुर (चिंचोली भोसे)

चिंचोली भोसे येथील क्षीरसागर वस्तीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला भगीरथ डीपीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. हा प्रश्न यापूर्वी अनेक आमदार, खासदार तसेच विविध स्तरांवर मांडण्यात आला होता. मात्र, ठोस तोडगा निघाला नव्हता.

स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत रामभाऊ गायकवाड यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत अखेर हा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळवले.

या कामाबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच युवा वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात येत असून, “हा प्रश्न इतर कुणाकडून सुटला नाही, मात्र रामभाऊ गायकवाड यांच्यामुळे तो मार्गी लागला,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

यावेळी चिंचोली भोसे येथील सर्व नागरिकांनी रामभाऊ गायकवाड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा शब्द दिला. तसेच, आपणही भविष्यात नागरिकांनी साथ दिल्यास येणाऱ्या काळात गावातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास रामभाऊ गायकवाड यांनी नागरिकांना दिला.

या निर्णयामुळे क्षीरसागर वस्तीतील नागरिकांची दीर्घकालीन अडचण दूर झाली असून, परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *