स्व. कलावती वैजिनाथ कोरके पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त विनोदाचार्य ह.भ.प. प्रकाश महाराज साठे (बीड) यांचे पुष्पवृष्टी कीर्तना चे आयोजन…..!

स्व. कलावती वैजिनाथ कोरके पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त विनोदाचार्य ह.भ.प. प्रकाश महाराज साठे (बीड) यांचे पुष्पवृष्टी कीर्तना चे आयोजन…..!

भोसे,करकंब (पंढरपुर)

भोसे ता. पंढरपूर येथे स्व. कलावती वैजिनाथ कोरके पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन सोमवार  दि. २०/१०/२०२५ रोजी सकाळी १० वाजता , भोसे(करकंब) ता. पंढरपूर येथे करण्यात आले आहे. स्व. कलावती वैजिनाथ कोरके ह्या माजी जिल्हा परिषद सदस्य होत्या. 

या पुण्यस्मरणा निमित्त कीर्तनकार विनोदाचार्य ह.भ.प. प्रकाश महाराज साठे (बीड) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री भारत वैजिनाथ कोरके पाटील, श्री संजय वैजनाथ कोरके पाटील, पुणे येथील श्री सतीश जालिंदर मुळे व बारामतीचे श्री पंकज अनिल भुसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त कोरके – पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *