प्रतिनिधी- पंढरपूर (गोपाळपूर)
भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा, घर घर तिरंगा रॅलीचे आयोजन झाले.
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याने देशभरात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होतो. याच निमित्ताने पंढरपूर जवळील गोपाळपूर येथे गोपाळकृष्ण विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली त उत्साहाने सहभाग घेतला.
तसेच यावेळी रॅली मध्ये गोपाळपूरचे नागरिक ही सहभागी झाले. पंढरपूर तालुक्यातील भाजप अध्यक्ष मा. श्री सुभाष मस्के सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संबोधन केले, त्यांच्यासोबत गोपाळपुरातील श्री दिलीप गुरव, गोपाळपूर चे विद्यमान सरपंच आणि शिक्षण संस्थेच्या संचालिका व ज्येष्ठ भारूडकार चंदाताई तिवाडी उपस्थित होत्या. शेवटी तिरंगा रॅलीत सहभागी झाल्याबद्दल गोपाळकृष्ण विद्या मंदिराच्या मुख्याध्यापकांनी सर्वांचे आभार मानले.