श्रीमंत लोकमान्य मित्र मंडळ च्या लोकगर्जना ढोल ताशा पथकाचे वाद्यपूजन सोहळा व सराव शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न……!

पंढरपुर –

महाराष्ट्राला अनेक उत्सवांचा वारसा लाभलेला आहे, त्यापैकीच अती जल्लोषात साजरा करण्यात येणारा गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना लगबग सुरू होते ती ढोल ताशा पथकांच्या सरावाची. असेच काहीसे दृश्य पंढरपूर मध्ये पहावयास मिळाले. मुहूर्त होता श्रीमंत लोकमान्य मित्र मंडळ यांच्या लोकगर्जना ढोल ताशा पथकाचे वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळ्याचा.

श्रीमंत लोकमान्य मित्र मंडळ हे पंढरपुरातील आग्रगण्य गणेशोत्सव मंडळ आहे. यावर्षी मंडळाचे 48 वे वर्ष असल्याने वाद्यपूजन सोहळा व सराव शुभारंभ मोठ्या भव्य आणि दिव्य पद्धतीने साजरा झाला. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक मा. श्री. प्रणव मालक परिचारक यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ह.भ.प. कुकुरमुंडे महाराज व पंढरपूर पोलीस प्रशासनातर्फे उपस्थित असलेले घोडके साहेब यांनी प्रथम प्रतिमा पूजन करून वाद्यपूजन केले त्यानंतर लोकगर्जना ढोल पथकाने सराव शुभारंभाचे प्रतीक म्हणून ढोल ताशा वादनाचे उत्तम सादरीकरण केले.

सोलापूर जिल्ह्यातील पहिले महिला ढोल पथक असाही मान लोकगर्जना ढोल पथकाच्या नावे आहे. हे पथक शिस्त, वादनातील लयबद्धता व त्यांच्या पारंपरिक पेराव्यामुळे प्रत्येक वर्षी चर्चेत असते.

लोकगर्जना पथकाचे सर्वेसर्वा श्री. सचिन कुलकर्णी सर यांनी या कार्यक्रमानिमित्त आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की शंभरहून अधिक वादकांची संख्या असणारे हे पथक केवळ कडक शिस्तीमुळे टिकून आहे. पथकाच्या यशस्वी संचलनाबाबत त्यांनी ताशा वादक श्री. अवधूत घाटे शुभम वाडेकर यांनाही कौतुकाची थाप दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *