पंढरपुर येथील जन सामान्यांच्या आंदोलनाला अखेर यश…..!

जो जनहित की बात करेगा, वही पंढरपूर नगरपरिषद पे राज करेगा….!

या विचारधारेने सुरू झालेल्या आंदोलनाला पाच दिवस पूर्ण झाले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांचा

“एकच ध्यास पंढरपुर चा विकास ” ही घोषणा ही चर्चेत राहिली.

श्री शिवश्री बहुउध्येशिय संघटनेच्या पंढरपूर जनहित क्रांती चळवळीला अखेर यश…..!

गेली पाच दिवस पंढरपूर येथील मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या सर्वात मोठ्या जन आंदोलनाला नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याकडून आश्वासन मिळाल्याने पूर्णविराम.

यावेळी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी श्री महेश रोकडे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शिवश्री संघटनेच्या अध्यक्षांना पत्रकाद्वारे आश्वासन दिले.

आंदोलकांच्या मागण्या व नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी कडून भेटलेले आश्वासने खालील प्रमाणे.

मागणी क्र. १

पंढरपूर मधील मालमत्ता धारकांना मालमत्ता करामध्ये सरसकट 50% सूट……!

मुख्य अधिकाऱ्याकडून मिळालेले उत्तर-

मालमत्ता कर हे नगरपरिषदेचे अतिशय महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असल्याने या करा मधूनच नगर परिषदेचे दैनंदिन व महत्त्वाचे कामकाज पार पडतात. तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार सदर मालमत्ता करा मध्ये माफी देण्याचे अधिकार नगरपरिषदेकडे निहित नाहीत.

मागणी क्र. २

पंढरपूर शहरातील शासकीय जागेमध्ये व्यवसायाकरिता ६ हजार गाळे बांधण्यात यावे.

उत्तर-

नगरपरिषदे अंतर्गत असणाऱ्या विविध जागा विकसित करते वेळी याचा सकारात्मकरित्या विचारात घेणे येत असून निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे त्वरित शिफारस पाठवण्यात येईल.

मागणी क्र. ३

बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांसाठी व्यवसाय करण्यासाठी गाळे किंवा कट्टे बांधून देण्यात यावे.

उत्तर-

सदर विषय सकारात्मकरित्या विचारात घेणे येत असून निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे त्वरित शिफारस पाठवण्यात येईल.

मागणी क्र. ४

जुने शॉपिंग सेंटरचे नव्याने गाळे बांधण्यात यावे.

उत्तर-

सदर विषय सकारात्मकरित्या विचारात घेणे येत असून निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे त्वरित शिफारस पाठवण्यात येईल.

मागणी क्र. ५

नगरपरिषदेमध्ये नागरिकांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण केंद्र असावे व ३६ तासात तक्रार निवारण व्हावी.

उत्तर-

नागरिकांच्या तक्रारीचा त्वरित निपटारा होणे करिता स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र त्वरित सुरू करत आहोत.

मागणी क्र. ६

पंढरपूर नगर परिषदेची हद्द वाढ करण्यात यावी.

उत्तर-

पंढरपूर नगर परिषदेची सण १९९२ सालामध्ये हद्द वाढ झाली असून सध्या असा कोणताही प्रस्ताव नगर परिषदेत मार्फत करण्यात आलेला नाही.

मागणी क्र. ७

नगरपरिषदेचा कारभार पारदर्शक करण्यात यावा.

उत्तर-

नगरपरिषद प्रशासन कारभार अधिक अधिक पारदर्शी करणे बाबत प्रयत्नशील राहील.

पंढरपूर नगरपरिषदे कडून जास्तीत जास्त मागण्यावर सकारात्मक उत्तर मिळाल्याने श्री शिवश्री संघटनेच्या चळवळीला तात्पुरता विराम दिला आहे. असे संघटनेचे अध्यक्ष अतुल करंडे व इतर सहकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. व वरील विषयाला आम्ही सतत पाठपुरावा करू, असेही यावेळी ते म्हणाले.

शेवटी सर्व आंदोलकांनी Lok न्युज चे आभार देखील मानले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *