लोकप्रिय दमदार आमदार मा. श्री अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त पंढरपूर येथील त्यांच्या संपर्क कार्यालया समोर एखाद्या साऊथ च्या सिनेमा प्रमाणे दृश्य पाहायला मिळाले.
माढा मतदारसंघा चे व पंढरपुरामध्ये लोकप्रिय असणारे आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त चक्क 100 JCB तुन पुष्पवृष्टी व 50 फुटी हार हे मात्र सर्वांचे लक्ष वेधत होते.
त्याच बरोबर विविध स्तरातून आमदार अभिजीत पाटील यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
सुस्ते येथील सप्तशृंगी परिवाराचे मा. श्री अतुल चव्हाण यांनी आमदार अभिजीत पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
कोर्टी येथील शिवभक्ती उद्योग समूहाचे मोहसीन मुलानी यांनी देखील आमदार अभिजीत पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
तर राजस्थानी सुतार समाजाचे प्रतिनिधी असलेले भोमेश सुतार यांनी आबांना राजस्थानी साफा(पगडी) घालुन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.