हल्ला केला अन् संपवलं; मृतदेह दरीत फेकला, सोनम पतीच्या मृत्यू डोळ्यासमोर पाहत राहिली अन्…राजा रघुवंशीच्या हत्येचं संपूर्ण सत्य आलं बाहेर !!

 

पोलिस तपासात आरोपींनी घटनेचा संपूर्ण तपशील सांगितला आहे, त्यांनी कशी राजा रघुवंशीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला यासोबतच पहिला हल्ला आरोपी विशाल उर्फ विक्की ठाकूरने केला होता अशी माहिती समोर आली आहे.

नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले मेघालय राज्य गेल्या काही दिवसांपासून एका हत्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. लग्नानंतर 12 दिवसांनी एक विवाहित जोडपे इंदूरहून मेघालयला हनिमूनसाठी गेले होते, पण काही दिवसांनी ते दोघे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. चर्चा सुरू असतानाच, दरीत एक मृतदेह सापडला. हा मृतदेह एका तरूणाचा होता, तोच राजा रघुवंशी जो त्याच्या पत्नीसोबत हनीमुनसाठी मेघालयला आला होता. राजा रघुवंशी मेघालयला पत्नीला फिरायला घेऊन गेला, पण तिथेच त्याचा दुर्दैवी शेवट झाला आणि त्यानंतर त्याची पत्नी सोनम बेपत्ता असल्याने पोलिसांनी दरी,परिसर, जंगलाची ठिकाणी, अशा ठिकाणी तिचा शोध घेतला. शोध सुरू असताना मात्र या प्रकरणात अचानक ट्विस्ट आला, आणि सगळंच पलटलं. पत्नीला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आली आहे. मृत राजाची पत्नी सोनम रघुवंशी दरोड्यापासून ते चक्कर आली इथंपर्यंत अनेक कथित गोष्टी तिने रचल्या, पण राजा रघुवंशी हत्याकांडाचे सत्य आता समोर आहे.

 

राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी ही या हत्येची मुख्य आरोपी आणि कट रचणारी असल्याचे सांगितले जाते. या हत्येत तिला इतर चार आरोपींनीही मदत केली होती, ज्यांनी चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे. इंदूर गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत, राज कुशवाह, विशाल, आकाश आणि आनंद या चारही आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे.

 

विशालने केला पहिला हल्ला

आरोपींनी सांगितले की, त्यांनी राजा रघुवंशीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला. गुन्हे शाखेचे एसीपी पूनमचंद यादव यांनी माहिती देताना सांगितलं की, पहिला हल्ला आरोपी विशाल उर्फ विक्की ठाकूरने केला होता. चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितले की, ते इंदूरहून ट्रेनने गुवाहाटी येथे पोहोचले होते आणि तेथून ते शिलाँगला गेले होते. इंदूरहून थेट ट्रेन नसल्याने त्यांनी मेघालयात पोहोचण्यासाठी अनेक ट्रेन बदलल्या.

 

सोनम तिच्या पतीचा मृत्यू पाहत होती

या काळात राज कुशवाहा इंदूरमध्येच राहिला, परंतु त्याने विशाल, आकाश आणि आनंद यांना मेघालयात खर्च करण्यासाठी 40-50 हजार रुपये दिले. सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे राजाची पत्नी सोनम देखील हत्येच्या वेळी उपस्थित होती. आरोपीने सांगितले की, सोनम तिच्या पतीला मरताना पाहत होती. हत्येनंतर राजाचा मृतदेह खोल दरीत फेकून देण्यात आला.

 

पोलिसांनी रक्ताने माखलेले कपडे केले जप्त

इंदूर गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात संपूर्ण माहिती फक्त मेघालय पोलिसांकडूनच मिळू शकते. सध्या तपास सुरू आहे. इंदूर पोलिसांना अद्याप या संदर्भात कोणतेही तथ्य सापडलेले नाही. एसीपी क्राइम ब्रांच पूनमचंद यादव म्हणाले की, विशालने खून करताना घातलेले कपडे त्याच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत. हे रक्त राजा रघुवंशीचे आहे की नाही याची खात्री करण्यासाठी ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील.

 

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात आजचा दिवस खूप महत्वाचा होता. सोनम रघुवंशी आणि या प्रकरणात अटक केलेल्या चारही आरोपींना शिलाँग न्यायालयात हजर केले. हजर होण्यापूर्वी, प्रत्येकाची वैद्यकीय चाचणी केली, त्यानंतर न्यायालयातून पोलीस कोठडी मागितली.

राज आणि सोनमची कहाणी एका छोट्या कारखान्यात सुरू झाली

मिळालेल्या माहितीनुसार, इंदौरमधील रहिवासी सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंह रघुवंशी यांचा एक छोटा प्लायवूड कारखाना आहे. राज कुशवाह नावाचा एक तरुण या कारखान्यात काम करायचा. तो सोनमपेक्षा सुमारे पाच वर्षांनी लहान आहे. सोनम अनेकदा कारखान्यात येत असे. ती अकाउंट्स आणि स्टाफ मॅनेजमेंटशी संबंधित काही जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या बहाण्याने ऑफिसमध्ये येत असे. याच काळात राज कुशवाह आणि सोनम यांच्यात जवळीक वाढली. कारखान्यातील कामगारांनीही त्यांना अनेक वेळा बोलताना पाहिले होते, पण हे प्रकरण इतके पुढे जाईल की लग्नानंतर सोनम तिच्या पतीचे आयुष्य उद्ध्वस्त करेल याची कोणालाही कल्पना नव्हती. पोलिसांनी राज कुशवाहाला अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस राज कुशवाह आणि कारखान्याचे सर्व रेकॉर्ड तपासत आहेत आणि त्यांचे मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले जात आहेत.

 

नियोजन करून हत्या

राजा रघुवंशी यांचा मृतदेह 2 जून रोजी मेघालयातील सोहरा परिसरातील विसावाडोंग धबधब्याजवळील एका नाल्यात आढळला. मृतदेहाची अवस्था खूपच वाईट होती. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे राजाची सोन्याची अंगठी आणि साखळी मृतदेहातून गायब होती. यामुळे पोलिसांना संशय आला की हा दरोडा टाकल्यानंतर नियोजित खून असू शकतो. आता असे समोर आले आहे की सोनमने तिच्या प्रियकर किंवा इतर काही लोकांसह हा कट रचला होता जेणेकरून कोणालाही काही संशय येऊ नये.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *