प्रा. रविंद्र गायकवाड यांचे निधन

तरडगाव (ता. फलटण):
तरडगाव येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते निवृत्त प्रा. रविंद्र राजाराम गायकवाड यांचे मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
प्रा. गायकवाड यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा. राजे रामराव महाविद्यालय, जत तसेच मीनलबेन महिला महाविद्यालय, पाचगाणी येथे अध्यापनाचे कार्य केले होते. सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यात सक्रिय होते.
ते श्री ज्ञानेश्वर माऊली विचार मंच, तरडगाव या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष होते. गावातील भागवतकथा, भजन व विविध धार्मिक-सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या अकस्मात निधनाने तरडगाव व परिसरात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पार्थिवावर तरडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.