लोकांच्या टीकेला कंटाळून प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडत असल्याचे जाहीर केले आहे. लेकीच्या ड्रेसमूळे एका बापाला ट्रोल केलं जातंय हे असह्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“आमची पोरं लहान असताना ८-८ दिवस माझी त्यांच्याशी गाठ होत नव्हती. आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत, यावरुन लोकांचे कमेंट्स येतात. आता ४ दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या… तुम्ही मला घोडे लावा.. माझा पिंड गेलाय… माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे. मुलीचं लग्न ठरल्यावर तिला कपडे कोण घेतं हे ही क्लिप टाकणाऱ्याला कळू नये का?…मुलगी तुम्हालाही आहे आणि मलाही आहे पण या ८ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलंय…दोन दिवसात मी एक क्लिप टाकणार…बास झालं ३१ वर्ष…लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्य चाललं सगळं.आयुष्यात चांगलं करूनही त्याचं हे फळ…माझ्यापर्यंत ठीक होतं पण घरादारापर्यंत जायला नको होतं, मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला…पण कुटुंबापर्यंत आल्यावर मज्जा नाही…लोकं कमेंट्स करतात की, ‘ इंदुरीकरने आता कीर्तन बंद करायला पाहिजे, त्याला लाज वाटली पाहजे ‘…आम्ही येत्या २-३ दिवसात यावर विचार करतोय आणि निर्णय घेतोय!”…