सांगोला मतदार संघात विकास कामाचा धडाका सुरूच…..!

सांगोला विधानसभा मतदारसंघात वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचा पहिला टप्पा: १ कोटींचा निधी मंजूर, दुसऱ्या टप्प्यात २ कोटींचा निधी मिळणार – आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख

सांगोला विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्रालयाने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी २ कोटी रुपयांचा निधी मिळणार असून, यामुळे मतदारसंघातील अनेक तांडा वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचा विकास होणार आहे.

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे, जी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने ओळखली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील तांडा वस्ती, भटक्या विमुक्ती आणि इतर मागासवर्गीय समाजातील वस्त्यांमधील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा विकास करणे आहे.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी इतर बहुजन कल्याण मंत्रालयाशी सतत पत्रव्यवहार आणि बैठका घेतल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे सांगोला मतदारसंघातील २० हून अधिक गावांतील तांडा वस्त्यांसाठी हा निधी मिळाला आहे. पहिल्या टप्प्यातील १ कोटी रुपयांचा निधी तात्काळ खर्च होईल, ज्यामुळे स्थानिक विकासकामांना गती मिळेल.

सदरचा निधी सांगोला विधानसभा मतदार संघासाठी मंजूर केल्याबद्दल आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे साहेब यांचे विशेष आभार मानले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *