3 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपहार्य पोस्ट करण्यात आली होती. सदर पोस्ट करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध पंढरपूर येथील वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पंढरपूर येथे गुन्हा नोंद केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की या पोस्ट मधून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या विरोधात आम्ही सदर व्यक्तीवर पंढरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे.
तसेच आरोपी व्यक्तीवर एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात गलिच्छ शब्दात जी फेसबुक पोस्ट केली होती या संदर्भात प्रशासनाकडून तत्काळ कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
अन्यथा ‘वंचित’ चा पॅटर्न दाखवू….!
यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी अशी घटना भविष्यात होऊ नये व सदर व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी संविधानिक मार्गाने उग्र आंदोलन छेडल असा इशाराही दिला.
सध्या सोशल मीडिया वरती युवकान कडून ट्रोलिंग करण्याचे चलन फार वाढले आहे. या ट्रोलिंग दरम्यान कित्येकदा पातळी सोडून अगदी वैयक्तिक टीका टिप्पणी केली जाते. याच दरम्यान सामाजिक सलोखा बिघडण्याची ही शक्यता असते. याचे भान देखील फेसबुक, इंस्टाग्राम, youtube या समाज माध्यमांवर कमेंट किंवा पोस्ट करताना युवकांना असले पाहिजे.
तालुका अध्यक्ष दीपक माने, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष विक्रम चंदनशिवे, तालुका उपाध्यक्ष प्रथमेश गोडबोले शहरअध्यक्ष राजू शिंदे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सर्वगोड युवक जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान चंदनशिवे , तसेच उपमहाराष्ट्र केसरी सादिक भाई पठाण,सचिन शिंदे, महेश रणदिवे, मोहम्मद रफी मुलानी अमित जाधव व शहर व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते