रामस्नेही संप्रदायाचे आंतरराष्ट्रीय संत श्री हरिराम जी शास्त्री यांच्या हस्ते “संत श्री जनाबाई वारकरी आध्यात्मिक कन्या गुरुकुल”चा नामकरण सोहळा उत्साहात संपन्न….!
पंढरपूर (प्रतिनिधी):
विजयादशमीच्या पवित्र शुभमुहूर्तावर “संत श्री जनाबाई वारकरी आध्यात्मिक कन्या गुरुकुल” या संस्थेच्या नामकरणाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.
या प्रसंगी चातुर्मास साठी दक्षिण काशी मानले जाणारे पंढरपुर येथे वास्तव्यास असलेले रामस्नेही संप्रदायाचे आंतरराष्ट्रीय संत श्री हरिराम जी शास्त्री यांच्या पावन हस्ते गुरुकुलाचे नामकरण करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित रामस्नेही परंपरेतील पूजनीय श्री रमता रामजी महाराज यांनी आशीर्वाद दिले व आंतरराष्ट्रीय रामस्नेही संत श्री हरिराम जी शास्त्री यांनी आपल्या आशीर्वचनांद्वारे उपस्थित भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
भाविकांची मोठी उपस्थिती
या मंगल सोहळ्याला परमार्थ आश्रमाचे ह.भ.प. श्री महंत १०८ लोकेश चैतन्य स्वामीजी महाराज, तसेच ह.भ.प. गणेश महाराज, ह.भ.प. विठ्ठल महाराज, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज, यांची उपस्थिती लाभली. सतगुरु जोग महाराज गुरुकुलातील सुमारे ५० विद्यार्थी या प्रसंगी सहभागी झाले होते.
या वेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चंदाताई तिवाडी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले, तर समारोप प्रसंगी संस्थेच्या सचिवा सौ. संध्या साखी यांनी सर्व उपस्थितांचे व भाविकांचे मनःपूर्वक आभार मानले.
हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात पार पडला. उपस्थित सर्वांनी गुरुकुलाच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.