अपुर्व ग्लोबल स्कूल येथे चिमुकल्यांनी साजरा केला दहीहंडी उत्सव…..!

तुझ्या घरात नाही पाणी,

घागर उताणी रे गोपाळा,

गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा.

संपूर्ण देशात काल कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. याच निमित्ताने ओझेवाडी येथील अपुर्व ग्लोबल स्कूल च्या बाल गोपाळ चिमुकल्यांनी दहीहंडी उत्सव साजरा केला.

 

आपल्या भारतीय सणांमध्ये काही ना काही शिकण्यासारखे असते त्याचपैकी दहीहंडी मधून एकसंघपणा, मैत्री, निर्णय क्षमता, शारीरिक समतोल असे विविध गुण विद्यार्थ्यांच्या अंगी यावे यासाठी अपुर्व ग्लोबल स्कूल नेहमी अग्रेसर असते.

हातात बासुरी घेऊन आला कृष्ण.

थरावर थर रचून सज्ज झाले मित्र.

मटकी फोडू , लोणी खाऊ,

गोविंदा गोपाळाची गाणी गाऊ.

एकतेने केलेली मेहनत नेहमीच गोड फळ देते. या विचाराने ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दाजीबा सावंत प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व अपूर्व ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष श्री.अपूर्व सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलचे कामकाज अत्यंत पारदर्शी व ग्रामीण भागात असणाऱ्या मुला मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण संस्थेची स्थापना करून दर्जेदार शिक्षण देण्याची हमी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. अपूर्व सावंत यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.स्कूलचे प्रिन्सिपल श्री. निलेश डोंगरे सर व स्कूलचा सर्व स्टाफ अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावत विविध उपक्रम राबवून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण स्कूलमधून देत आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यात शिक्षक वर्ग व कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग होता असेही प्रिन्सिपल म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *