पंढरपूर व पंढरपुरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शहरातील मध्यवर्ती भागात स्टेशन रोड येथे शिवश्री संघटनेकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची माहिती घेण्याकरिता आमच्या प्रतिनिधींनी आंदोलन स्थळी भेट दिली व आंदोलनास बसलेल्या काही मंडळींची मते जाणून घेतली.
“जो जनहित की बात करेगा वही पंढरपूर नगरपरिषद पर राज करेगा“!
या उद्घोषाला अनुसरून सदरील आंदोलन हे जनतेच्या हिताचे आहे त्यामुळे पंढरपुरातील बहुसंख्य नागरिकांकडून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा भेटला आहे. अशा आशयाचा सुर जन सामन्यातून येताना दिसतोय. असे संघटने चे अध्यक्ष श्री अतुल करंडे व सहकारी शांतिनाथ रोकडे यांनी सांगितले
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या.
सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता करामध्ये 50 % सूट
युवा व्यवसायीकां करिता 6 हजार गाळे बांधावे.
जुन्या व्यवसायिक संकुलांचे नूतनीकरण
भाजी विक्रेत्यांना स्थायी स्वरूपाचे कट्टे किंवा गाळे बांधावे.
पंढरपूरची प्रलंबित असलेली हद्दवाढ लवकरात लवकर करावी
तक्रार निवारण खिडकी -36 तासांमध्ये नागरिकांच्या तक्रारीचे निवारण व्हावे याकरिता स्वतंत्र विभाग असावा.
पंढरपूर नगर परिषदेचा कारभार पारदर्शक व्हावा
अशा विविध मागण्या घेऊन पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रशासनाला त्रस्त झालेल्या व भोंगळ कारभारावर नाराज असलेल्या नागरिकांनी हे आंदोलन उभे केले आहे.
संबंधित मागण्या नगरपरिषदेने मान्य न केल्यास नगर विकास मंत्री व आयुक्त यांच्या समोर आमरण उपोषण करू असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला.
नगरपरिषदेचे माजी कर्मचारी दत्तात्रय बडवे यांनी देखील या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. त्यावेळी ते म्हणाले की नगरपरिषदेला मालमत्ता कर व पाणीपट्टी यात 50 टक्के सूट देणे शक्य आहे कारण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी साठी 100% सरकारी ग्रँड असल्याने हा बोजा नगर परिषदेवर नाही. व शहरातील रस्ते, सार्वजनिक शौचालये, सामुदायिक भवन, अशी विविध विकास कामे शासनाने तीर्थक्षेत्र विकास निधी मधून केलेली आहे. पुढे बोलताना त्यांनी पंढरपुरातील नागरिकांना आवाहन केले आहे की येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये जो कोणी या मुद्द्याला प्राधान्य देईल त्यालाच निवडून आणावे. असे ही ते म्हणाले.
आंदोलनाला आहे पारंपारिकते सोबत आधुनिक टेक्नॉलॉजी चा टच.
९७६३६३३६२९ या क्रमांका वर मिसकॉल देऊन आंदोलनात सहभाग.
आतापर्यंत आंदोलन म्हंटलं तर समोर येतात पोस्टर, घोषणाबाजी, निवेदने इतर. परंतु पंढरपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आंदोलनाला पारंपारिक आंदोलनासोबत आधुनिक टेक्नॉलॉजी ची साथ लाभली आहे. पंढरपुरात प्रथमच जवळपास ३ दिवसात १२,०० लोकांनी मिस कॉल द्वारे या चळवळीत भाग घेतला आहे. तसेच पारंपारिक पद्धतीने जवळपास ४०० लोकांनी स्वाक्षरीद्वारे आपला सहभाग नोंदवला
आतापर्यंत श्री मोहन केरप्पा शिंदे (भटके विमुक्त आदिवासी महासंघ महाराष्ट्र),
श्री राजेंद्र माणिक भोसले (आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष),
श्री रमेश किसन कांबळे (माजी नगरसेवक),
श्री तुळजाराम भीमराव बंदपट्टे (प्रहार संघटना पश्चिम महाराष्ट्र सचिव) व मानव अधिकार अध्यक्ष सोलापूर,
श्री मुकुंद गाडगे (लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष)
संतोष थिटे, रामचंद्र आटकळे, विजय सुरवसे,
मंगेश मधुकर बिडकर, परमेश्वर डांगे,विकास आसबे,
धनंजय कुलकर्णी, बापू देवमारे, शत्रुघ्न वाघमारे,
ज्ञानेश्वर झेंड, अरविंद सुरवसे ,मुकुंद जाधव,
योगेश मठपती, अनिल गुज्जरवार, नवनाथ सुरवसे,
अभिजीत राजूरकर, नजीर पटवेकरी, रवींद्र गायकवाड,
विशाल ननवरे , गोविंद आगवणे, दत्तात्रय शिनगारे,दिनकर चव्हाण, प्रवीण आचलारे.
यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व सहभाग नोंदवला.