परिचारक गटाची १५ वर्षा च्या वर्चस्वाची परंपरा अबाधित

 पंढरपूर – (प्रतिनिधी.) २९ जुलै

तुंगत- ता.पंढरपूर येथील विविध विकास कार्य सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक गटाचे मा.सरपंच आगतराव रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील श्री.तुंगेश्वर शेतकरी विकास पॅनलने सर्व १३ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले तर विरोधी आ.अभिजीत पाटील, प्रकाश पाटील, कल्याण काळे गट गटाला मोठा पराभव पत्करावा लागला.

 पंढरपूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या कायम चर्चेत असणाऱ्या तुंगत गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर मा.आ.श्री प्रशांतराव परिचारक यांचे गेल्या १५ वर्षापासून अबाधित वर्चस्व आहे, रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत पूर्वीचे परिचारक गटात आघाडी असणारे गट यावेळेस परिचारक गटाच्या विरोधात जाऊन आ. अभिजीत पाटील, प्रकाश पाटील, कल्याण काळे यांच्या गटाने निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मोठी कंबर कसली होती.

 रवि. दि. २७ जुलै रोजी पार पडलेल्या सोसायटी निवडणुकीमध्ये परिचारक गटाने मा. सरपंच आगतराव रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकत विरोधी गटाचा पार सुपडा साफ केला. परिचारक गटाने हा विजय मोठ्या आतीषबाजीत व जल्लोष साजरा केला.

 श्री. तुंगेश्वर शेतकरी विकास पॅनल चे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे –

आनंद आंद (६५८), बाळू आंद(६६२), शिवाजी नागणे(६६६),नारायण पवार(६४६), खंडेराव रणदिवे(६४४), गणपत रणदिवे(६१९), महादेव देवचंद रणदिवे(६४८), महादेव ब्रह्मदेव रणदिवे(६२९), सुनंदा कदम(६८२), ऐश्वर्या रणदिवे(६७७),संतोष वनसाळे(६९४), शब्बीर मुलाणी(६९६) ,बाबासो कोळेकर(७०५) पॅनलचे

उमेदवारांना विजयी करण्यासाठी परिचारक गटाचे मा. सरपंच आगतराव रणदिवे, मा. संचालक कालिदास रणदिवे, मा. चेअरमन तानाजी रणदिवे, संजय रणदिवे, महेश रणदिवे, लक्ष्मण कदम,महेश गायकवाड, वामन वनसाळे, सर्जेराव भोसले, सुहास काळे, तानाजी पवार, रामकृष्ण नागणे, किसना पवार, दादा देठे, बाळू देठे, रमेश आंद, अनिकेत रणदिवे,संदीप वनसाळे आदींनी परिश्रम घेतले.

 विजयी उमेदवारांचा मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करीत त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *