पंढरपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस.
प्रतिनिधी – पंढरपुर
पंढरपूर मधील प्रदर्शना रोड हे पावसाने पूर्णपणे भरलेला आहे. रस्ता कुठे आणि पाणी कुठे हे नागरिकांना व वारकऱ्यांना समजेनासे झाले आहे.
आषाढी वारी होऊन काही दिवस च झाले, तोपर्यंत पंढरपूर मध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी साचलेलं आढळून आले. नेमकं नगरपालिकेला लाखो रुपये चा निधी कुठे खर्च केला हेच कळना.
नेमके नगरपालिका अधिकारी आणि नगरपालिका चा निधी कुठे गेला? याची नागरिकांमध्ये चर्चा आणि त्याच बरोबर संतापाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे.
पंढरपूर नगरपालिका लाखो करोडो चा निधी दरवर्षी येतो आणि परंतु त्या दर्जाची कामे पंढरपूरमध्ये होत नाहीत.
जसा निधी येतो तशी कुठलीही काम आढळून येत नाहीत. जर निधी येत असता तर कामे पण त्या पद्धतीची झालेली दिसून आली असती असे नागरिकांचे मत आहे.
नागरिकां मध्ये अशी चर्चा केली जात आहे की….
अजून किती दिवस असे चालणार?
पंढरपूरचा निधी नेमका कुणासाठी येतोय?
अधिकाऱ्यांसाठी का अजून कुणासाठी?
हे समजणंच कठीण झालं आहे.

