गोपाळपूर येथे पार पडला गोपाळपूरच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा.
प्रतिनिधी – पंढरपुर
दि. 20/07/2025
पंढरपूर जवळील गोपाळपूर येथे लोकमान्य गणेशोत्सव तरुण मित्र मंडळाच्या वतीने साजरा केला श्रीं चा पाद्यपूजन सोहळा.
या सोहळ्या दरम्यान बाप्पांच्या पादुकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच लोकमान्य मंडळाच्या ढोल ताशा पथकाने गणरायाला वंदना दिली.
यावेळी यावर्षीचे मंडळाचे
नवनिर्वाचित अध्यक्ष – सुरज भुमकर
उपाध्यक्ष- योगेश बडवे
खजिनदार – सुरज चौगुले
सह खजिनदार – राजू रत्नपारखी
सचिव – आदित्य पवार
सहसचिव – सोहम कुंभार
मूर्ती रक्षक – मयूर निर्मळ
मिरवणूक प्रमुख – कृष्णा भूमकर, समीर पवार, भारत शिंदे. व इतर सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोपाळपूर मधील प्रियदर्शनी नगर, इंदिरा कॉलनी येथील लोकमान्य गणेशोत्सव तरुण मित्र मंडळ हे त्यांच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ओळखले जाते. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरज भुमकर यांनी ही सर्व माहिती दिली.