महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जवळपास 14 हजार महिलांना कॅन्सर असल्याची खळबळ जनक माहिती समोर….
हिंगोली जिल्ह्यात जवळपास 14 हजार महिला कॅन्सर संशयित असल्याची खळबळ जळक माहिती समोर आली आहे.
हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या संजीवनी अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील विविध भागात आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान ही मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
या संजीवनी अभियानात दरम्यान 13 हजार 956 महिला या विविध प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये स्तन कॅन्सर व गर्भाशय कॅन्सरचे प्रमाण अधिक असल्या ची त्यांनी माहिती दिली.
गर्भाशय कॅन्सरचे 7 हजार 526 रुग्ण तर 2 हजार 699 स्तन कॅन्सरचे रुग्ण व 3 हजार 633 तोंडाचे कर्करोग रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व रुग्णांची तालुका स्तरावर स्क्रीनिंग करण्या चे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. नागरिकांना नवीन जीवन देण्या साठी या संजीवनी अभियानाची रूपरेखा हिंगोली जिल्हा परिषदेने केली असल्याचे जिल्हाधिकारीनि माहिती दिली. व त्यांनी पुढे सांगितले की सर्व संशयित रुग्णांचे वी.आय.ए. व बायोप्सी चाचणी केली जाईल.
इतक्या मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण सापडणे ही एक धक्कादायक बाब आहे. आशा वर्कर यांनी केलेल्या सर्वेतील बेजबाबदारपणा की जबरदस्ती केलेल्या लसीकरणाचे दुष्परिणाम?
तसेच याबाबत विविध माध्यमातून वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. एका जिल्ह्यामध्ये 14,000 संशयित रुग्ण सापडणे ही एक मोठी बाब आहे. यासाठी नक्कीच जबाबदार कोण? सर्वे करणाऱ्या आशा वर्कर की कोरोना काळात जबरदस्तीने केलेले लसीकरण?