चंद्रभागा नदीत तीन महिलांचा बुडून मृत्यू,मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
प्रतिनिधी – पंढरपुर
पंढरपूर येथील चंद्रभागा नदीमध्ये शनिवारी सकाळी तीन महिला भाविक बुडाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बेवारस एक महिला व जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तीन महिलांपैकी दोन महिलांचे मृतदेह सकाळी सापडले होते तर एका महिलेचा शोध सकाळपासून सुरू होता.तो मृतदेह दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पुंडलिक मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या बंधाऱ्याजवळ सापडला. मृतदेह सापडल्यानंतर मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.सुनिता सपकाळ वय 40 आणि संगीता सपकाळ 40 असे मृत महिला वारकऱ्यांची नावं आहेत.
पंढरपूर मध्ये शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दहा ते पंधरा महिला भाविक चंद्रभागेच्या पवित्र स्थानासाठी आले असताना पुंडलिक मंदिराच्या वरच्या बाजूला पाण्याचा अंदाज न आल्याने दोन महिला भावी पाण्यामध्ये बुडाल्या. सध्या चंद्रभागेला उजनी धरणातून पाणी सोडण्या सुरू असल्याने चंद्रभागेचे पाणी पातळी वाढली आहे. आणि चंद्रभाग नदीच्या काठावरती आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात नसल्याने तसेच यांत्रिक बोटी नसल्याने या महिला भाविकांना वाचवता आले नाही.
जालना जिल्ह्यातून काही महिला भाविक काल रात्री पंढरपूर मध्ये दर्शनासाठी आले होते.रात्री सर्वांनी मठामध्ये मुक्काम केला आणि आज चंद्रभागेमध्ये पवित्र स्थान करून विठ्ठलाचे दर्शन घेण्याचे नियोजन होते.मात्र चंद्रभागेमध्ये स्थान करण्यासाठी गेल्यानंतर दुर्घटना घडली आणि दर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली.सुनीता सपकाळ यांना 2 मुले,2 मुली तर
संगीता सपकाळ यांना 2 मुली 1 मुलगा असा परिवार आहे.दोघेही गावाकडे
शेतमजुरी करत होत्या.त्या दोघी पहिल्यांदाच पंढरपूर ला आल्या होत्या.
आषाढीयात्रा काळात चंद्रभागा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर समितीकडून 25 लोकांची रेस्कु टीम आणि दोन यांत्रिक बोटी तैनात करण्यात आल्या होत्या.यात्रा काळात या रेस्कु टीम ने 60 भाविकांना जीवदान दिले होते.मात्र यात्रा संपल्यानंतर मंदिर समितीने बोटी जमा करून घेतल्या आणि कामावरील मुलांना काढून टाकले.जर आपत्ती व्यवस्थापन पथक सक्रिय असते तर या महिला भाविकांचे प्राण वाचले असतील अशी चर्चा भाविकांमध्ये होती.