आषाढी वारी पूर्वतयारी सुरू.
पंढरपूर मधील अतिक्रमण व रस्ते दुरुस्ती असे अनेक प्रकारचे कामे वेगाने सुरू आहेत त्याच अनुषंगाने पंढरपूर मध्ये जिल्हा अधिकारी आशीर्वाद कुमार यांचे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रदक्षिणा रोड तसेच पंढरपुरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण संदर्भात पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान आशीर्वाद कुमार यांनी प्रदक्षिणा रोडवरील व्यापारी वर्ग यांना अतिक्रमणासंदर्भात सूचना दिल्या. तसेच दोन दिवसापूर्वी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काही भागातील अतिक्रमण हटवण्याचे काम पूर्ण केले. याच दरम्यान राहिलेल्या काही अतिक्रमणांना आशीर्वाद कुमार यांनी समक्ष भेट देऊन अतिक्रमण हटवण्याची सूचना दिली.
या पूर्ण पाहणी दरम्यान आशीर्वाद कुमार यांनी प्रदक्षिणा रोड तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सावरकर चौक या रोडवरील व्यापाऱ्यांना अतिक्रमण आठवणीच्या सूचना दिल्या. या पाहणी दरम्यान आशीर्वाद कुमार त्यांच्यासोबत पोलीस प्रशासन व नगरपालिका अधिकारी उपस्थित होते.