‘असंख्य भारतीय मुस्लिमांना…’, Shikhar Dhawan ची कर्नल सोफिया कुरेशीवरील पोस्ट का होत आहे Viral?

Shikhar Dhawan on Sophia Qureshi : 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 जणांची हत्या केली होती. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये लोकांची नावं विचारल्यानंतर त्यांची हत्या केली होती, त्यांनी हिंदूंना लक्ष्य केलं होतं. दहशतवाद्यांना भारतात हिंदू आणि मुस्लिम समोरासमोर यावे अशी इच्छा होती पण तसं झालं नाही. भारत सरकार आणि भारतातील जनतेने दहशतवाद्यांचे मनसुबे यशस्वी होऊ न देतात पलहगाम हल्ल्याचा बदला घेतला. अखेर तो दिवस उजाडला 7 मे रोजी, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैनिकांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलं. जिथून भारतात दहशतवाद पसरवण्याचे कट रचले जात होते. या कारवाईची माहिती देण्यासाठी दोन महिला आल्यात, एक भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि दुसरी कर्नल सोफिया कुरेशी आहेत.  

काय म्हणाला शिखर धवन?

सोफिया कुरेशी यांचा देशभरातून कौतुक होतं आहे. अशात टीम इंडियाचा ‘गब्बर’ शिखर धवनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली असून ती सध्या व्हायरल होते आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘भारताचा आत्मा त्याच्या एकतेत आहे. कर्नल सोफिया कुरेशी सारख्या वीरांना आणि देशासाठी शौर्याने लढणाऱ्या आणि आपण कशासाठी उभे आहोत हे दाखवून देणाऱ्या असंख्य भारतीय मुस्लिमांना सलाम. जय हिंद!’

शिखर धवनची पोस्ट व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर कमेंटही करत आहेत. ते म्हणाले की, ‘देशातील काही नेते, जे कोणाबद्दलही काहीही बोलतात, त्यांनी त्यांच्याकडून धडा घेतला पाहिजे.’

मध्यप्रदेशचे मंत्री विजय शहा यांना फटकारलं!

खरंतर, यूजर्सने हे मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्या संदर्भात म्हटलं असून ज्यांनी अलीकडेच भारताच्या या नायिकेसाठी आक्षेपार्ह शब्द वापरले होते आणि यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकारले होते. सर्वोच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई (CJI BR Gavai) यांनी म्हटलं आहे की, ‘संवैधानिक पदावर असलेली व्यक्ती असे विधान कसे करू शकते?’

विजय शाह यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआर प्रकरणात हस्तक्षेप करण्यास आणि एफआयआरला स्थगिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला. सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही फक्त मंत्री आहात म्हणून काहीही होणार नाही, पण या पदावर असल्याने तुम्ही जबाबदारीने विधाने केली पाहिजेत. ,

विजय शाह यांनी कर्नल कुरेशी यांच्याबद्दल काय विधान केलं होतं?

एका सरकारी कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले होते की, पंतप्रधानांनी 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात उपस्थित असलेल्यांसारख्या “बहिणीला” पाठवले आहे. त्यानंतर  बिनशर्त माफी मागितल्यानंतरही, शाह यांना देशभरातून टीकेचा सामना करावा लागला. एका व्हिडीओ निवेदनात त्यांनी खेद व्यक्त करत म्हटलं आहे की, ‘माझ्या विधानांमुळे मला केवळ लाज आणि दुःख होत नाही, तर मी मनापासून माफी देखील मागतो.’

Source

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *